देश - विदेश
ब्रेकिंग! युद्ध अटळ, भारत पाकिस्तानला थेट भिडणार?

- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव गेला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून शस्त्रसंधी करार रद्द करण्याचा विचार सुरू असून हे पाऊल थेट युद्धाच्या दिशेने जाणारे ठरू शकते.
- काही मीडिया रिपोर्टनुसार, भारत सरकार शस्त्रसंधी करार रद्द करण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२१ मध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानने अनेकदा नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दहशतवादी गट जसे की, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्याकडून काश्मीरमध्ये सतत घुसखोरी होत असल्याने सरकारने आता निर्णायक कारवाईचा विचार सुरू केला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट इशारा दिला आहे की, पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांना कुठेही लपले असले तरी भारत त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. याआधीच भारताने सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला धक्का दिला आहे. आता शस्त्रसंधी हटवून थेट लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले जात आहेत.