पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानला आनंद?

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतात संतापाचे वातावरण आहे. मात्र, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात असे काही घडले की, जणू हा हल्ला साजरा केला जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
पहलगाम येथे द रेसिस्टेन्स फ्रंट या दहशतवादी गटाने हिंदू पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. भारतात या हल्ल्यामुळे रोष आहे, तर पाकिस्तानात याची खुषी असल्याचे दिसते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एक व्यक्ती केक घेऊन जाताना दिसत आहे. मीडियाने या व्यक्तीला याबाबत प्रश्न विचारले, पण त्याने कोणतेही उत्तर न देता केक घेऊन आत प्रवेश केला. यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात हा केक मागवण्यात आला.