देश - विदेश
ब्रेकिंग! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचीच फाटली

- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे आपला हात असल्याचा इन्कार करत स्थानिक बंडखोर संघटनेचे हे कृत्य असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याच्या भीतीने पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरसह देशभरात अलर्ट जारी केला आहे. आपल्या हवाई दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्याबरोबरच भारत-पाकिस्तान सीमेवर टेहळणी वाढवण्यात आली असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि इस्लामाबाद यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- पाकिस्तानला भारताकडून पुन्हा हल्ला होण्याची भीती वाटत आहे. उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक तसेच एअरस्ट्राइक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. आता पहलगाममध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या मागे जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे भारताने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हीच भूमिका मांडली असल्याने पाकिस्तानला भीतीने घेरले आहे.