सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! पुन्हा हॉट, पुन्हा तगमग

- राज्यात एप्रिल महिन्यातच मे सारखी स्थिती जाणवत आहे. पुढचे चार दिवस हवामानात मोठे बदल होणार असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. दरम्यान सोलापुरात आज पुन्हा 43.8 अंश इतके तापमान होते. दरम्यान नागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे. घराबाहेर जाताना पाणी सोबत ठेवावे, शिवाय छत्री, टोपी घेऊन जावे, कोणतीही हयगय करू नये असे म्हटले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.