क्राईम

पहलगाम दहशतवादी हल्ला, पत्नीशी बोलताना गोळीबाराचा आवाज आला

  • पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. अनेक पर्यटक अजूनही धक्क्यात आहेत. अशाच एका थरारक अनुभवाला सामोरे गेलेल्या जळगावच्या तुषार वाघुळदे यांनी काळजाचा ठोका चुकवणारी कहाणी सांगितली.
  • तुषार यांच्या पत्नी किशोरी वाघुळदे आपल्या मैत्रिणींसह काश्मीरमध्ये सहलीला गेल्या होत्या. त्या पहलगामजवळील बैसरन परिसरात फिरत असताना तुषार यांच्याशी फोनवर बोलत होत्या. अचानक त्यांनी फोनवर सांगितले, इकडं गोळीबार सुरू झालाय आणि तेवढ्यात फोन कट झाला. त्या क्षणी तुषार यांच्या काळजात धस्स झाले.
  • हल्ल्याच्या क्षणात सैन्याने त्वरित हालचाल करत सर्व पर्यटकांना संरक्षण दिले. किशोरी यांनी पती तुषार यांना सांगितले की, आर्मीच्या वाहनामागे लपवून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले गेले. त्यांनीच इतर घाबरलेल्या पर्यटकांना धीरही दिला. किशोरी या स्वतः काउन्सिलर असल्याने अशा कठीण परिस्थितीत त्यांचा अनुभव उपयोगी आला.
  • सैन्याच्या मदतीने रात्री सर्व पर्यटकांनी सुरक्षित मुक्काम केला. आता किशोरी आणि इतर पर्यटक कटरा येथे माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहेत. मात्र, जरी जीव वाचला असला तरी त्या काही क्षणांची भीती त्यांना कायम आठवण करून देणारी ठरणार आहे.

Related Articles

Back to top button