सात वर्षांचे प्रेम क्षणात आटले; सरकारी नोकरी लागताच बायकोने रंग दाखवला

महिलांवर अत्याचार होतात, याचा बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. सासरच्या जाचाला कंटाळून अनेक महिला आपले जिवन संपवतात. पण गेल्या काही वर्षांत पुरुषांवरील अत्याचारातही वाढ झालेली आहे. त्यातून त्यांनी टोकाची पाऊल उचलल्याचेही समोर आले आहे. बंगळुरूच्या अतुल सुभाषचे प्रकरण ताजे आहे. तसेच एक सर्वांना हादरवून सोडणारे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या इटावा येथे घडले आहे. येथे एका इंजिनिअर तरूणाने आत्महत्या केली आहे. त्या मागचे कारण ज्यावेळी समोर आले, त्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.
मोहित यादव हा पेशाने इंजिनिअर होता. त्याचे वय 33 वर्ष होते. त्याने इटावा रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्या आधी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. त्यात आपण आत्महत्या का करत आहोत याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मोहितने 27 नोव्हेंबर 2023 साली लग्न केले होते. पत्नी प्रिया बरोबर तो जवळपास सात वर्ष रिलेशनमध्ये होता. त्यानंतर घरच्यांच्या परवानगीने त्यांनी विवाह केला होता. सुरूवातीला सर्व काही ठिक चालले होते. पण नंतर सारे काही बिघडले.
दोन महिन्यापूर्वी प्रिया यादव म्हणजेच मोहितच्या पत्नीला बिहारच्या समस्तीपूर येथे सरकारी नोकरी लागली. ती शाळेवर शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिथेच सर्व चक्र फिरली. मोहितने जो व्हिडीओ केला आहे त्यात त्याने याचा उल्लेख केला आहे. त्याची पत्नी गर्भवती होती. पण तिने तिच्या आईच्या सांगण्यावरून गर्भपात केला. शिवाय नोकरी लागल्यानंतर प्रियाचे रंग बदलले होते. तिने मोहितची संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी तगदा लावला होता. तसे केले नाही तर खोट्या हुंड्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी ती देत होती, असा त्याने आरोप केला आहे.
मोहितने आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. त्यांनी तिथले पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्यांनी त्याची सुसाईड नोट आणि व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. ते फॉरेन्सिकच्या ताब्यातही दिले आहेत. शिवाय जे आरोप केले आहेत, त्यानुसार तपासही सुरू केला आहे.