‘फॅण्ड्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश्वरी आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या नव्या धार्मिक प्रवासामुळे चर्चेत असून या पोस्टनंतर तिचे अनेक चाहते संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे.
राजेश्वरीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरुन ती धर्मांतर करत असल्याचा अंदाज लावता येतो. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. त्या फोटोत ती पाण्यात उभी असून, हात जोडलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “बाप्तिस्मा स्वीकारले” असे लिहिले आहे. याचबरोबर तिने एक ग्रुप फोटो देखील शेअर केला असून, त्यात ती काही लोकांसह दिसून येते.
तिच्या पोस्टमध्ये बायबलमधील एक विधान देखील नमूद केले आहे, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहेत.
राजेश्वरीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. काहींनी “काळी चिमणी गेलीस” अशा प्रकारच्या टीका केल्या आहेत. काहींनी तिला अनफॉलो केल्याचीही माहिती दिली आहे.