राजकीय
राज ठाकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी?

- राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. दोन्ही पक्षांमधील जवळीक आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येत असताना आता मनसेमध्येच याबाबत मतभेद उफाळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज यांनी थेट परदेशातून मनसे नेत्यांना महत्त्वाचा निरोप दिला आहे.
- राज आणि उद्धव यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना मनसेच्या अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. अमेय खोपकर यांनी युतीला “अभद्र” संबोधत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
- ठाकरे गटाकडून मनसे नेत्यांच्या टीकेला उत्तर देणे टाळण्यात आले आहे. राज सध्या सुट्टीसाठी परदेशात असून, त्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना “युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका” असा स्पष्ट निरोप दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत परत आल्यानंतर ते स्वतः युतीबाबत भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे सध्या कोणताही गोंधळ न निर्माण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.