क्राईम

कर्नाटक! एकेकाळी होते पोलिसांचे बॉस, पण बायकोने घेतला जीव

  • कर्नाटक राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बेंगळुरूमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश आज त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले. 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांचा मृतदेह बेंगळुरूतील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला.
  • अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी डीजीपींच्या मृत्यूमध्ये त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
  • दरम्यान माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश याने रीतसर तक्रार दाखल केल्यावर त्यांची हत्या उघडकीस आली. या हत्येत आई आणि मुलगी या दोघांचा हात असल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पल्लवीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर हत्या करण्यात आली होती. ही हत्या रविवारी रात्री त्याच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर घडली, तेथे ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्याच्या शरीरावर विशेषतः मानेवर आणि पोटावर चाकूच्या जखमा होत्या.
  • ओमप्रकाश यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत, त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले होते. गळ्याला आणि पोटाला धारदार चाकूसारख्या हत्याराचे निशान होते आणि त्यांचे कपडेही फाटलेले दिसले.
  • पोलिसांनी सांगितल्यानुसार ओमप्रकाश यांची हत्या ज्यावेळी झाली तेव्हा ते जेवण करत होते, जेवणावेळी त्यांच्या तोंडावर मिरचीची भुकटी फेकण्यात आली, त्यानंतर दहा ते बारा चाकूसारख्या हत्याराचे घाव करण्यात आले होते.
  • सूत्रांनी सांगितले की, हत्येनंतर निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीशी बोलून तिला मी राक्षसाला मारले असेही सांगितले.. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओम प्रकाशची पत्नी आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. आई आणि मुलीची आता सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पोलिस प्रमुखांच्या धक्कादायक हत्येतील पत्नी ही प्रमुख संशयित आहे.

Related Articles

Back to top button