क्राईम

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आला आहे. ही केवळ आत्महत्या नसून एका नियोजित मानसिक छळाचा कट असल्याचे समोर आले आहे. डॉ. वळसंगकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूने वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

तसेच या प्रकरणात पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक करून चौकशी सुरू केली. पहिल्याच दिवशी सहा तासांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. माने यांच्या चौकशीनंतर आता पोलिसांनी वळसंगकर यांची सून डॉ. सोनाली यांचीही चौकशी केली आहे.

डॉ. सोनाली वळसंगकर या स्वतःही सोलापुरातील डीएनबी न्युरोसर्जन आहेत. सासऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली असून तपास गोपनीय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पोलीस तपास अधिक गडद होत असून आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करण्याचाही विचार केला जात आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हे केवळ नैराश्य नव्हे, तर सतत होणाऱ्या छळामुळे घेतलेले पाऊल असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व संबंधितांची चौकशी सुरु केली आहे. सुनेची चौकशी या आरोपांची पुष्टी करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Related Articles

Back to top button