क्राईम

डॉ. शिरीष वळसंगकरांच्या रुग्णालयात अमावस्येला लिंबू, बाहुली

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आला आहे. ही केवळ आत्महत्या नसून एका नियोजित मानसिक छळाचा कट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणी मनिषा माने-मुसळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी मनिषाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आरोपी मनिषा ही काळ्या जादूच्या आहारी गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

डॉ. वळसंगकर हे शांत स्वभावाचे होते. मात्र, त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर अनेकांना धक्का बसला. एका वृत्तानुसार, रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकाराने डॉ. वळसंगकर हे व्यथित झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. वळसंगकर असे कसे स्वतःचे जीवन संपवतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. डॉ. वळसंगकर यांच्या एक निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांना हॉस्पिटलमध्ये जे जे चालले होते, त्याचा वैताग आला होता. त्यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली. त्यानंतर महत्त्वाकांक्षी असलेल्या मनिषाने त्रस्त झाली. तिने काळ्या विद्येचाही प्रयोग सुरू केला. बिब्बा, लिंबू अन् काळ्या बाहुल्या ती रुग्णालयातील वेगवेगळ्या भागात ठेवू लागली.

आरोपी मनिषा हिला काळी जादू करण्याचा नाद लागला होता, असे डॉक्टराच्या निकटवर्तीयाने सांगितले. अमावास्येच्या दिवशी मनीषा ही ऑन ड्यूटीच अचानक रिक्षामधून जायची. कुठे जायची हे ठाऊक नाही; पण येताना लिंबू, बिब्बा अन् काळ्या बाहुल्या घेऊन यायची. त्या साऱ्या दवाखान्यात ठेवून जायची. एक मशीन बसवतानाही तिने खाली या वस्तू ठेवल्या. तिच्या या प्रकाराला डॉ. वळसंगकर हे वैतागले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

Related Articles

Back to top button