बिजनेस
ब्रेकिंग! सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला

- सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाही दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात सोन्याच्या दरांनी एक लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे आता दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव जीएसटी कराची रक्कम धरून एक लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात थोडीफार तफावत पाहायला मिळत आहे.
- मुंबईत सोन्याचा भाव किती? मुंबईत सोन्याचा दर आज प्रति तोळा एक लाख 116 रुपयांवर पोहोचला आहे.
- पुणे सोन्याचे दर- 96,200 रुपये 10 ग्रॅम विना जीएसटी. 99,100 रुपये दहा ग्रॅम जीएसटी धरून.
- कोल्हापूर सोने दर- सोने दहा ग्रॅम ( एक तोळा ) 96,600 विना जीएसटी.
- सोने दहा ग्रॅम ( एक तोळा ) 99,600 जीएसटी धरून.
- छत्रपती संभाजीनगर- सोने दहा ग्रॅम- 99 हजार 500 जीएसटीसह.
- सोलापूर- जीएसटीविना 24 कॅरेट – 96,700,22 कॅरेट – 89,990.



