देश - विदेश

मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा अदृश्य हात

  • मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले आहे. दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्यासाखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
  • गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे भांडारी म्हणाले.

Related Articles

Back to top button