क्राईम

कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृत्यू

  • कर्नाटक राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बेंगळुरूमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश आज त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले. 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांचा मृतदेह बेंगळुरूतील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला.
  • अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी डीजीपींच्या मृत्यूमध्ये त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूची अधिक चौकशी सुरू आहे.
  • प्राथमिक तपासानुसार, प्रकाश यांची हत्या त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी केल्याचे सांगिले जात आहे. त्यांच्या शरीरावर पोलिसांना चाकूने वार केल्याचे आढळले. तीन मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात प्रकाश यांचा मृतदेह आढळला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी प्रकाश यांच्या पत्नी आणि मुलीची चौकशी सुरू केली आहे.
  • डीजीपींनी यापूर्वी काही जवळच्या संपर्कांना त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांना संशय आहे की, या घटनेत कुटुंबातील एखाद्या सदस्याचा सहभाग असू शकतो. 

Related Articles

Back to top button