खेळ

खुशखबर! टीम इंडियाकडून चाहत्यांना नव्या वर्षाचे गिफ्ट

बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो, असे वाटत होते. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाची लाज राखली. भारताने या सामन्यासह मालिकाही २-० ने जिंकली आहे.
टीम इंडियाच्या या विजयाचे नायक अश्विन आणि श्रेयस अय्यर ठरले. या दोघांनी संघाला संकटातून बाहेर काढले आणि अखेरीस सामना जिंकवला. सामन्यात बांगलादेशने भारताला १४५ धावांचे लक्ष्य दिले होते.
टीम इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात ४५-४ अशी केली होती, पण काही वेळातच भारताने ३ विकेट गमावल्या. अशा स्थितीत भारतावर पराभवाचे संकट ओढावले होते. अखेरीस श्रेयस अय्यर (२९), रविचंद्रन अश्विन (४२) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे बांगलादेशचे स्वप्न भंगले.

Related Articles

Back to top button