मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यावर दगडफेक

Admin
1 Min Read

मराठा समाजाला इतर मागास वर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक काल अंतरवाली सराटी येथून शहागड-पैठणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई सुरू झाली आहे. आता कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, वाटेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला असून काही समाजकंटकांनी जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे यांचा ताफा अहिल्यानगर-कल्याण मार्गावर पोहोचल्यानंतर काल रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान काही गाड्यांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक पिकअप आणि एका स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फुटल्या. तसेच यामध्ये एक आंदोलक जखमी झाल्याचे सांगितले जात असून सदर जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share This Article