क्राईम
ब्रेकिंग! दीनानाथ मंगेशकर प्रकरणी आईच्या निधनानंतर बाळांच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर

- पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी वेळेत निर्णय न घेतल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बाळंतपणासाठी दहा लाखांची मागणी केल्याने उपचारात विलंब झाला आणि तनिषा यांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- तनिषा या प्रसूतीसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीलाच कुटुंबीयांना बाळंतपणासाठी वीस लाख रुपये लागतील, अशी अट घातली. यापैकी तातडीने दहा लाख रुपये भरण्याची सक्त सूचना करण्यात आली. भिसे कुटुंबाकडून तातडीने तीन लाखांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवण्यात आली. पण रुग्णालयाने ही रक्कम अपुरी मानत उपचार सुरू करण्यास नकार दिला.
- या विलंबामुळे तनिषा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला. त्यानंतर तब्बल तीन तासांनी त्यांना वाकड येथील सूर्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र त्यांचा चेहरा पाहण्यापूर्वीच तनिषा यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून आर्थिक अडचणीपायी एका सुदृढ मातेला आपला जीव गमवावा लागल्याने समाजमन संतप्त झाले आहे.
- तनिषा यांनी जुळ्या मुलींचा जन्म दिला. एक बाळ १.१२२ किलो तर दुसरे ६४० ग्रॅम वजनाचे असून सुरुवातीला एक बाळ व्हेंटिलेटरवर होते. आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तनिषा यांची अनुपस्थिती हा कधीही न भरून निघणारा आघात आहे.