क्राईम
‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल., डॉक्टर घैसास अन् केळकर

- पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला आहे.
- या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणावर गोरखे म्हणाले, मी आता रुग्णालयाचा अहवाल पाहिला. त्यांची चूक झाली आहे. पण स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी अहवाल दिला आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी अहवाल दिला आहे. रुग्णाला कॅन्सर होता, असे म्हटले तर एखादी महिला आठ महिन्यांची गर्भवती कशी राहू शकते? या सर्व प्रकारात IBF द्वारे गर्भधारणा झालेली आहे. रुग्णालयाने दहा लाख मागितले हे स्पष्ट आहे. त्याची पावती आहे.
- महाराष्ट्रातून अनेक फोन येत आहेत. रुग्णालयाची अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. माझा घैसास यांचा विरोध नाही, त्यांच्या वृत्तीला विरोध असल्याचे आमदार गोरखे म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार जणांची समिती गठीत केली आहे. त्यातून सत्य समोर येणार आहे.