बिजनेस
Redmi 12 Pro+ 5G या दिवशी होणार लॉन्च

Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. नुकतीच या फोनची भारतातील लॉन्च तारीख समोर आली आहे. Redmi ने त्यांच्या अधिकृत भारतीय ट्विटर हँडलद्वारे Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतातील लॉन्च डेटची पुष्टी केली आहे.
हा फोन पुढील वर्षी 5 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होईल. हे भारतातील या मालिकेतील सर्वात प्रीमियम डिव्हाइस असेल. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे फीचर त्याचा पावरफूल 200MP कॅमेरा असेल. दरम्यान, या दिवशी Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनसोबत या सीरीजचे इतर डिव्हाइसेस देखील भारतात लॉन्च केले जाऊ शकतात असे मानले जात आहे.