बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली पण…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे ही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे.
फेकबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर ज्याचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.
लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी आहे. दरम्यान अकोला पोलिसांनी देखील लोणकर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अकोला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र शुभम लोणकर याच्या घराल कुलूप लावलेले दिसून आले.