क्राईम

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांची खळबळजनक माहिती

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेशन शाखेची १५ पथके गुन्ह्याचा तपास करत आहेत. तिसरा आरोपी शिवा पनवेलमधून परराज्यात पळून गेल्याचा संशय असून पोलिसांचे पथक परराज्यातही गेले आहे. मुंबई पोलिसांकडून सगळ्या शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे क्राईम ब्रँचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले. सिद्धिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग आहे की आणखी कुणाचा? याचा सर्वांगाने तपास केला जात आहे. व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता आम्ही तपासून बघत असल्याचेही डीसीपी नलावडे यांनी सांगितले.

आरोपींकडे मिरचीचा स्प्रे देखील सापडला आहे. आरोपी आधी मिरचीचा स्प्रे बाबा सिद्धिकी यांच्यावर फवारणार होते आणि ते खाली पडल्यावर त्यांच्यावर गोळीबार करणार होते. परंतु तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने थेट सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांनी प्लान बदलला, असे डीसीपी नलावडे यांनी सांगितले. ही माहिती आरोपींनीच पोलिस तपासात दिली आहे.

Related Articles

Back to top button