क्राईम
ब्रेकिंग! भाजप नेत्याने पत्नी व मुलांवर केला गोळीबार; तिघांचा मृत्यू

- उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
- भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. योगेश रोहिल्ला असे या भाजप नेत्याचे नाव आहे.
- दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.
- अधिक माहिती अशी की, भाजप नेते योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे. योगेश रोहिल्ला मागील अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केले यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
- स्वत: योगेशने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना जाऊन सांगितला. आपणच आपल्या तीन मुलांवर आणि बायकोवर गोळीबार केल्याचे त्याने सांगितले.