क्राईम
ब्रेकिंग! सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्या

- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आपला क्लोजर रिपोर्ट मुंबई न्यायालयात सादर केला आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत आपल्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
- दरम्यान सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच असल्याचे समोर आले आहे.
- कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. सीबीआयने तब्बल चार वर्षे चार महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
- अखेर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला असून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे.