क्राईम
पुन्हा सैराट! प्रेमविवाह केला, २४ तासातच नवरीची केली हत्या

- मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. नेहाच्या कुटुंबीयांनी तिला सूरजला भेटण्यापासून अनेक वेळा रोखले होते, परंतु तरीही तिने गाझियाबादच्या आर्य समाज मंदिरात 11 मार्च रोजी सूरजशी लग्न केले. लग्नाची माहिती मिळताच आरोपी भानू राठोड आणि त्याचा मुलगा हिमांशू राठोड यांनी 12 मार्च रोजी सकाळी नेहाला पकडून तिची हत्या केली आणि अंत्यसंस्कारही केले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला.
- पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. शिवाय, सीसीटीव्ही फुटेजही मिळवले आहे. या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.