राजकीय

ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना नवा दणका

  • विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष ठाकरे गटाला कोकणातून मोठा फटका बसला आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी, माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ही मलिका अजुनही थांबायचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे. 
  • महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप या ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास एक तास तटकरे आणि जगताप कुटुंब यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे स्नेहल जगताप आता अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
  • महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप सहकुटुंब आज खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीता बागमध्ये दाखल झाल्या. खासदार तटकरे आणि त्यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Related Articles

Back to top button