क्राईम

आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही

  • प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तुझी लायकी आहे का? पाटलाची देशमुखासंग सोयरीक करायची, अशी धमकी तरूणाला देण्यात आली. याच भीतीपोटी एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • नांदेड शहराजवळच्या सुगांव येथे गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे.
  • नितीन याचे थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. एक वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती झाली. मुलीच्या नातेवाईकाकडून तरूणाला धमक्या देण्यात आल्या. 18 मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकांनी गावात नितीनला मारहाण करत घरापर्यंत आणले. पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करुन नितीनला धमकी दिली.
  • तुमची लायकी आहे का पाटील देशमुखासंग सोयरीक करायची, गावात येईन बेइज्जत करतो. चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन वरून दिली. तेव्हा भीतीपोटी नितीन या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन मुलीसह ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button