महाराष्ट्र
ब्रेकिंग! नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची प्रॉपर्टी जप्त होणार

- नागपूर हिंसाचाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. जमावाने आक्रमक होत दगडफेक केली, तोडफोड केली त्यामुळे यात कोट्यवधींचे नुकसान झाले. या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये जाऊन दंगल झालेल्या भागांची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.
- या हिंसाचारात दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार, जे काही नुकसान झालेले आहे ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्यांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.
- फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये जी घटना झाली, त्याचा संपूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला आहे. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता. या दंगलीत सहभागी झालेल्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



