महाराष्ट्र
जनता नाही, पुढारीच जातीयवादी, आपल्या स्वार्थासाठी…

- सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अमरावतीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
- एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार उफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
- अमरावतीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार वितरण सोहळा गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबचे उद्घाटन गडकरींनी केले. यावेळी बोलताना गडकरी यांनी राजकीय पुढाऱ्यांचाच समाचार घेतला.
- राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे, राष्ट्रकारण विकासकारण आहे. पोस्टर, बॅनर लावून काही होत नाही हे सगळे क्षणिक आहे. जनतेच्या मनात तुमचे जे स्थान असेल ते सगळ्यात मोठ आहे. जनतेचे जीवनमान बदलणे खूप महत्त्वाचे आहे. जात पुढारी निर्माण करतात. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात, असे गडकरी म्हणाले.



