महाराष्ट्र

औरंगजेबच्या कबरीचा वाद आता थेट हायकोर्टात

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणी संबंधीचा वाद वाढतच चालला आहे. या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • ही याचिका आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केतन तिरोडकर यांनी असा युक्तिवाद केला आहे की, औरंगजेबचा मकबरा राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यातून पुढच्या पिढीला वारसा म्हणून देण्यासारखे किंवा शिकण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्रातील खुलताबाद, संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीला ऐतिहासिक स्मारकांच्या यादीतून हटवण्याचे निर्देश द्यावेत.
  • याचिकेत हेही नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारने हा मकबरा पुरातत्त्व विभागाच्या यादीतून वगळून तो कायमस्वरूपी हटवावा, जेणेकरून भविष्यात कोणताही सांप्रदायिक तणाव निर्माण होणार नाही.

Related Articles

Back to top button