क्राईम

प्रेम विवाह केलेली पत्नी माहेरी गेली, पतीचा प्रचंड संताप

  • त्याने प्रेम विवाह केला. मात्र त्यानंतर काही महिन्याचे पत्नीचेच अपहरण केले. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडली आहे. 
  • या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अगदी सिने स्टाईल झालेल्या अपहरणानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. 
  • कल्याणी दळवी या 19 वर्षाच्या तरुणीने दोन महिन्यापूर्वी वैभव पवार या तरुणा बरोबर लग्न केले. तो सिन्नरच्या पांगरी येथील रहिवाशी आहे. या दोघांचा प्रेम विवाह होता. 20 जानेवारीला या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर तिला तो मारहाण करायला लागला. त्यामुळे लग्न झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात 8 मार्चला ती माहेरी निघून आली. पत्नी माहेरी गेली हे वैभवला काही पटले नाही. त्याला त्याचा प्रचंड संताप झाला. त्यातून त्याने पत्नीचेच अपहरण करण्याचा कट रचला.
  • 19 मार्चला कल्याणी आपल्या आईसह पांगरी येथे गेली होती. त्यांच्या बरोबर तिचा भाऊही होता. त्याचवेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेवून तिथे आला. कुणाला काही समजण्याच्या आत त्यांनी कल्याणीवर झडप टाकली. तिला गाडीत कोंबले. तिला सोडवण्यासाठी आई पुढे सरसावली. पण तिला ही मारहणा करण्यात आली. भावाला ही मारण्यात आले. शेवटी कल्याणीला गाडीत टाकून तो तिथून पसार झाला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला.
  • बळजबरीने गाडीत टाकल्यानंतर वैभव तिला घेवून संगमनेरला नेले. पुढे बसने तो तिला लोणीपर्यंत घेवून आला. शिर्डीच्या दिशेने पायी जात असताना त्यांच्यावर पोलिसांना संशय आला. त्या दोघांनाही पोलीसांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर कल्याणीने आपल्या बरोबर झालेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. कल्याणीच्या फिर्यादी वरून पोलिसांनी तिचा पती आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Related Articles

Back to top button