क्राईम

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंड फहीम खानच्या मुसक्या आवळल्या

  • औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यातच नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. आता नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे कोण आहे, याचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. फहीम हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. आता नागपूर पोलिसांनी फहीम या मास्टरमाइंडला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
  • गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात फहीम याने लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला. निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर तो राजकारणात सक्रीय झाला. शहरात आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न तो करु लागला. नागपुरातील हिंसाचाराचा कट आधीच रचला गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. फहीम यानेच काही कट्टरपंथी लोकांना एकत्र करुन सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Related Articles

Back to top button