क्राईम
ब्रेकिंग! 38 वर्षाचा फहीम खान नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार

- नागपूर हिंसाचाराबाबत पोलिसांच्या एफआयआरमधून गोष्टी समोर आल्या आहेत. फहीम शमीम खान या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे एफआयआरमधून समोर आले आहे. फहीम हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पक्षाचा शहराध्यक्ष आहे. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फहीमच्या नेतृत्वात हे सगळे झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
- सोमवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाज प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. त्याबाबत फहीम याने 40-50 जणांना बेकायदेशीपणे जमा केले. त्यानंर गणेशपेठ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. याप्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर शांतता कायम राखण्याचे आवाहन केले होते.
- तरी देखील फहीम याने काही लोकांना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास एकत्र जमवून धार्मिक वाद निर्माण होईल ह्या उद्देशाने कट रचला. जवळपास 500 ते 600 लोक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे जमा झाले. पोलिसांनी सर्वांना जमा न होता आपापल्या घरी सुरक्षितरित्या निघून जावे, असे आवाहन केले. मात्र जमावातील कुणीही काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
- त्यावेळी जमलेला जमाव एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. जमावाने काही महिला कर्मचाऱ्यांना पाहून अश्लील इशारे करत अश्लील शेरेबाजी केली, अशीही माहिती समोर आली आहे.