क्राईम

पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू, सोडणार नाही

नागपूर हिंसाचारात ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू. कुणालाच सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बाकी इतर गोष्टी क्षम्य आहेत, पण पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, असे फडणवीस यांनी निक्षून सांगितले. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याची टीका विरोधकांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी फडणवीस यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोची आकडेवारी सभागृहासमोर मांडतानाच नागपूर हिंसाचारानंतरची सध्याची परिस्थितीही सभागृहाला अवगत केली.

नागपूरचे पोलीस आयुक्त आणि माझ्या माहितीत तफावत असल्याचे विरोधक सांगत आहेत. पण तेच मला ब्रिफिंग करतात. त्यामुळे आमच्या माहितीत अजिबात तफावत नाही.

नागपूर हिंसाचारात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्यांना कबरीतून खोदून काढू. इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी नाही. नागपूर शांत आहे, ते नेहमी शांत असते. गेल्या काही वर्षांत नागपूरमध्ये कधीच दंगल घडली नाही. या समाजाने किंवा त्या समाजाने असे मी म्हणणार नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले, असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

Back to top button