क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे हळूहळू उलगडू लागले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता कोर्टात खटला सुरू झाला असून पहिली सुनावणी पार पडली आहे.
- देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन वॉचमनचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला. यावेळी सुदर्शनने या वॉचमनना मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा देखील नोंद आहे.
- अवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करा, अशी धमकी देखील दिली होती. घुले आणि इतरांकडून झालेल्या मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच देशमुख या ठिकाणी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, असे घुले आणि त्याच्या साथीदारांना देशमुख म्हणाले. त्यावेळी घुलेने सरपंच देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे वॉचमनने आपल्या जबाबात म्हटले आहे.



