क्राईम

नागपूर का पेटले? सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

  • नागपुरात काल सायंकाळच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. दोन्हींकडून परस्परांवर दगडफेक करून गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्व घटनेचा आढावा घेतला आहे. याप्रकरणी 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली आहे. मंत्री बावनकुळे आणि पोलीस आयुक्त यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून दोन समाजात द्वेष निर्माण झाला, असे बावनकुळेंनी सांगितले. माझी नागपूरकरांना हात जोडून विनंती आहे की, नागपूरची संस्कार आणि संस्कृती ही सर्वसमाजाला सोबत घेऊन काम करायची आहे, असेही बावनकुळेंनी म्हटले. नागपूर शहरात जिथे तणावपूर्ण परिस्थिती आहेत, तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे लोकप्रतिनिधी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. माझी नागपूरकरांना हात जोडून विनंती आहे की, नागपूरची संस्कार आणि संस्कृती ही सर्वसमाजाला सोबत घेऊन काम करायची आहे. विरोधी पक्षाने या घटनेला राजकीय दृष्टीकोणातून पाहू नये. पुन्हा अशी घटना घडू नये, याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अधिक लक्ष सोशल मीडिया अकाऊंटवर आहे, असे बावनकुळेंनी सांगितल. 

Related Articles

Back to top button