महाराष्ट्र

दंगली कशाल घडवताय, सरकारने जाऊन औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून नागपूरमध्ये काल चांगलेच रान पेटले. दोन गट आमनेसामने येऊन दगडफेक झाली आणि हिंसा उसळली. त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नागपूरमधील या हिसेंच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट मत मांडले आहे. राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत ? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे.

मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ -फावडं घेऊन जावे आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार असलेल्या राऊतांनी केली.

कोणाची प्रेरणा आहे, दंगली का पेटवल्या जात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केले. राजापुरात काय घडले, अन्य भागात काय घडले हे माहीत आहे. होळीसारख्या सणांना कधी महाराष्ट्रात दंगल उसळली नव्हती. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील आपलीच लोक. काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक या राज्यात हिंदू-मुसलमान दंगल पेटवत आहेत.

बाबरीचे उदाहरण देत आहेत. बाबरीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू म्हणत आहेत. सरकार तुमचे आहे ना, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत ना, दंगली कशाल घडवताय, सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. तुमच्याच विचारांचे सरकार आहे ना. मोहन भागवत, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ -फावडं घेऊन जावे आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button