मनोरंजन
‘छावा’कडून सारेच्या सारे चक्काचूर

- ‘छावा’ हा चित्रपट सोलापूरसह अन्य भागात 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नव-नवीन विक्रम मोडत आहे. सलग पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे.
- विक्की कौशल्यचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दररोज नवे-नवे विक्रम करत आहे. या चित्रपटाने 23 व्या दिवशी 16.75 कोटीचा गल्ला जमवला आहे. तर आता 24 व्या दिवसाची ही कमाई समोर आली आहे. सैकनिकच्या रिपोर्टनुसार 24 व्या दिवशी 11.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘सैकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘छावा’ने रिलीजच्या 29 व्या दिवशी 559.43 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 534.2 कोटी आणि तेलुगूमध्ये ‘छावा’ने 12.55 कोटी कमावले आहेत.
- छावा चित्रपटाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. आता छावाने गदर-2 चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. गदर चित्रपटाचे लाइफटाइम एकूण कलेक्शन 525.7 कोटी रुपये आहे. या सोबतच हा छावा चित्रपट आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10 वा चित्रपट बनला आहे.