बिजनेस

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरच्या दरात कपात

केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. त्याआधी सर्वसामान्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 

व्यावसायिक सिलेंडरची किंमत सात रुपयांनी कमी झाली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. दरम्यान 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

नव्या दरांनुसार आजपासून मुंबईत 19 किलोचा सिलेंडर कपातीनंतर 1749.5 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा भाव 1756 रुपये होता.

Related Articles

Back to top button