क्राईम
नोटांची रास, अंगावर पैशांची उधळण, गाणं लावलं थारा पैसा-थारी गाडी

- बीडच्या वााल्मिक कराड आणि त्याच्या गँगची क्रूरतेची कहाणी संपते ना संपते तोच आता शिरूरच्या खोक्या नावाचा नवा गावगुंड चर्चेत आला आहे. कधी शिकारी, कधी जनसामान्यांना त्रास देण्याचे धंदे तर कधी पैशाच्या राशी आणि त्याच पैशांची अंगावर उधळण… खोक्याचा कुबेरी रुबाब पाहून सारा महाराष्ट्र अचंबित झाला आहे. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता. भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा तालुक्याचा अध्यक्ष. त्याची संपत्ती पाहून अनेकांना तोंडात बोटे घातली आहेत.
- भोसले उर्फ खोक्याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यात पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांची बंडले समोरच्या टेबलावर ठेवली आहेत. त्या बंडलांमधील नोटा त्याच्या अंगावर उधळल्या जात आहेत. त्यामुळे खोक्याकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- पैशात लोळतानाचा खोक्या पाहून तो नेमका काय करतो, त्याचा व्यवसाय कोणता, त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असे सवाल बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. या चित्रफितीला थारा पैसा, थारी गाडी, थारा बंगला… असे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीत लावून आपल्या संपत्तीचे दर्शन करण्याचा खोक्याचा उद्देश स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्याच्या लक्ष्मीदर्शनाच्या स्त्रोताची पोलीस चौकशी करणार आहेत का, असेही प्रश्न नागरिक विचारत आहेत.