क्राईम

भरधाव कंटेनरने उडविले

  • एका कंटेनर चालकाने भरधाव वाहन चालवत जवळपास १० ते १२ वाहनांना धडक दिली होती. चाकण-शिक्रापूर रस्त्यावर १६ जानेवारी २०२५ रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारांदरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. तब्बल ४६ दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
  • पौर्णिमा अंबादास गाढवे (वय-२९, रा-रासे, ता-खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पौर्णिमा यांचा मृत्यू झाला.
  • दरम्यान चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अपघातानंतर ८ दिवसांनी म्हणजे २३ जानेवारी रोजी पौर्णिमा यांची ९ वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. 

Related Articles

Back to top button