खेळ
केन विल्यमसनची विकेट घेताच विराट अक्षर पटेलच्या पायाच पडला

- चॅम्पियन ट्रॉफीचा अखेरचा सामना काल रंगतदार झाला. एकवेळ न्यूझीलंडक झुकलेला सामना भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आपल्याकडे खेचून आणला. 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 205 धावांत गारद झाला. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन बाद झाल्यानंतर सामन्यावर टीम इंडियाने पकड निर्माण केली. विल्यमसनने 81 धावांची खेळी केली.
- डावाच्या सुरुवातीपासूनच विल्यमसन हा उत्तम खेळ करत टीम इंडिया आणि विजय यांच्यामध्ये ठाम उभा ठाकला होता. त्याच्या खेळीमुळे न्युझीलंड हा सामना जिंकतो की काय असे वाटत होते. एकीकडे त्यांचे फलंदाज पटापट तंबूत परत जात होते.
- पण विल्यमसन हा टिकून होताच. अखेर अक्षर पटेलने विल्यमसनला बाद केले. त्यानंतर स्टेडिअममध्ये एक वेगळाच, सगळ्यांच्या लक्षात राहील असा नजारा दिसला. विल्यमसनची विकेट मिळताच विराट कोहलीने पुढे जाऊन अक्षरचे पाय धरले, तो त्याच्या पाया पडत होता. अशा पद्धतीने त्याने पुढे जाऊन अक्षरचे अभिनंदन केले. त्याचा हा अंदाज पाहून सगळेच अवाक झाले, अक्षरलाही हसू फुटले. कोहली आणि अक्षरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटीझन्सनीही कमेंट करून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.