खेळ

टीम इंडियाच ठरणार जगज्जेता

  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेमध्ये टीम इंडियाने विजयी सुरुवात करत पाकिस्तानला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला आहे. संपूर्ण जगभरात क्रिकेट रसिकांमध्ये सध्या क्रिकेटचे फीवर पाहायला मिळत आहे. भारतात तर क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे क्रिकेटशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात क्रिकेट रसिकांना रस असतो. विश्वचषक कोण जिंकेल यावर तर्कवितर्क लावले जात असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांनी भारतीय संघ विश्वचषक जिंकून नवीन इतिहास घडवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
  • भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धा जिंकणार का, असा प्रश्न विचारला असता इराणी म्हणाले, सध्या पाकिस्तानात आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाची कामगिरी पाहता टीम इंडिया आगामी विश्वचषक स्पर्धासुद्धा सहज जिंकेल, असा विश्वास डॉ. अली इराणी यांनी व्यक्त केला आहे.
  • दरम्यान आजच्या क्रिकेटपटूंसाठी फिटनेस अनिवार्य घटक बनला असला तरी भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा संघाकडे फिजिओथेरपिस्टही नव्हता. १९८७ मध्ये डॉ. अली इराणी भारतीय संघाचे पहिले अधिकृत फिजिओथेरपिस्ट बनले आणि त्यांनी संघातील खेळाडूंच्या दुखापतींवर जागीच उपचार करून त्यांना लवकरात लवकर पुनरागमन करण्यास मदत केली.

Related Articles

Back to top button