क्राईम

तरुणी स्वतःहून बसमध्ये गेली आहे. ती आधी बसमध्ये चढली. परस्पर संमतीने हा प्रकार घडला आहे, त्यामुळे तो अत्याचार घडत नाही

पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट बस स्थानकात पहाटे 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी फरार असलेला दत्तात्रय गाडे अखेर त्याच्या गुनाट गावात सापडला. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीचे वकील वाजिद खान बीडकर यांनी खळबळजनक युक्तीवाद केला.

खान म्हणाले, आरोपीने तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. ते वर्दळीचे ठिकाण आहे. जर माझ्या क्लायंटने जबरदस्ती केली असती तर तरुणीकडून विरोध झाला असता, प्रतिकार केला असता. मात्र तसा कोणताही विरोध झालेला नाही. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी शांतपणे बसमध्ये जाताना दिसत आहे. त्यामुळे गाडे आणि तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

Related Articles

Back to top button