मोठी बातमी! वाल्मिक कराडचा नवा कारनामा

सध्या बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत असून या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याचे आणि मुंडे यांच्या मैत्रीचे, व्यावयासिक भागेदारीबाबत अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यामध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिकचा बीडच्या राजकारणात आणि प्रशासकीय कामकाजातील हस्तक्षेप समोर येत आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.
अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिकची लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती झाल्याचे समोर आले असून वाल्मिकवर १४ गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतले कसे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.



