क्राईम

भरधाव ट्रकने घात केला

  • भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची धक्क्कादायक घटना राज्यात घडली आहे. ही घटना काल पुण्यातील उंड्रीतील कानडे नगर येथे घडली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय-३४ वर्ष, रा. अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
  • प्रणाली दाते या दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न झाला होता. दरम्यान ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय-३५ वर्ष, मूळ गाव तुळजापूर, धाराशिव) याने घटनास्थळावरून पळ काढला. फरार झालेल्या आरोपीला ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने शोधून अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button