क्राईम
ब्रेकिंग! प्रेम प्रकरणातून भर चौकात कोयत्याने वार, वाहतूक पोलिसामुळे…

- सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान आज पंढरपुरात एक धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीच्या चुलत्याने त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली असून भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- यामध्ये निमकर गंभीर जखमी झाले असून गंभीर हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेले निमकर सकाळी बाईकवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते. यादरम्यान, संशयित आरोपी अमित वाठारकर याने निमकर यांची बाईक अडवली. नंतर धारदार कोयता बाहेर काढत सपासप वार केले. ही घटना घडतच असताना एक वाहतूक पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते.
- आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करत होते. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.



