महाराष्ट्र

ब्रेकिंग! शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक सूचक विधान केले आहे. मागील काही दिवसांपासून पवारांच्या खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांकडे या’ असा संदेश अजितदादा पवारांच्या पक्षाकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. असे असतानाच पवार यांनी युवकांसमोर बोलताना पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केले आहे. पवारांनी त्यांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिले आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी पक्षावर पुन्हा 1999 सारखी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांनी तरुणांशी संवाद साधताना, जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा आपण लढणे पसंत करु, असेही पवारांनी म्हटले आहे.

पुढील 15 दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील, असे सूचक विधानही पवार यांनी केले आहे. 1999 साली जी आपली परिस्थिती होती, तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही, असेही पवार यांनी तरुण सहकाऱ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button