राजकीय

ब्रेकिंग! कॉंग्रेसचे टेन्शन वाढले

  • इंडिया आघाडीत काँग्रेस पक्ष आता एकाकी पडू लागला आहे. मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा बाळगायला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीतील दोन प्रमुख मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा राखत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. यात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे. परिणामी इंडिया आघाडीत फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता आरजेडी नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे.
  • यादव यांनी बक्सरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेजस्वी म्हणाले की, इंडिया आघाडी बनवत असताना असे ठरले होते की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असे ते म्हणाले.
  • इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसप्रती नाराजीचे सूर उमटत आहेत. दोन्ही राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल असमाधान व्यक्त केले होते. त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. तसेच उत्तर प्रदेशातील महत्वाचा पक्ष असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
  • दरम्यान, बिहारमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका आहेत. येथे आरजेडी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. अशातच आता तेजस्वी यांनी इंडिया आघाडी केवळ लोकसभेपुरती होती, असे विधान केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे टेन्शन वाढले आहे.

Related Articles

Back to top button