मनोरंजन
‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे कालवश

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे आज निधन झाले. चित्रपट सृष्टीसाठी हा मोठा धक्काच आहे. शेंडे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेंडे यांचे वय 75 होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम करून रसिकांची मने जिंकली. मराठी शिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. निवडुंग, जसा बाप तशी पोर या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. वास्तव या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी आत्तापर्यंत पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांमधून रसिकांचे मनोरंजन केले. अलीकडच्या काही काळापासून मात्र ते सिने सृष्टीपासून दूर होते.