
सोलापूर (प्रतिनिधी) मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथे आज दुपारी दोनच्या सुमारास बंदेनवाज दर्गा जवळ दत्तात्रय वामन वराडे (वय-५१) यांचा इंचगाव येथील विजय नागनाथ घुले यांनी अज्ञात कारणावरुन कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ नागनाथ वामन वराडे यांनी कामती पोलिसांना दिली आहे.संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की इंचगाव ता.मोहोळ येथील बंदेनवाज दर्गा परिसरात सिमेंट कोब्यावर दत्तात्रय वामन वराडे (वय-५१, रा.इंचगाव ता. मोहोळ) हा बसलेला असताना त्यास विजय नागनाथ घुले (रा. इंचगाव. ता.मोहोळ) याने अज्ञात कारणावरुन त्याचा जीव घेण्याच्या इराद्याने कुऱ्हाडीने वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले आहे. या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सपोनि. ज्ञानेश्वर उदार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.